वाह, आता 'फ्री'मध्ये थायलँडला फिरा; फक्त करावे लागेल 'हे' एक काम

थायलँडला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता मोफत पूर्ण थायलँड फिरू शकता

भारतच नाही तर जगभरातून मोठ्या संख्येने लोक थायलँडला जातात. भारतासह ९३ देशातील लोकांना इथं कुठलाही व्हिसाची गरज नसते

आता थायलँडमधील पर्यटन मंत्र्‍यांनी घरगुती उड्डाणावर मोफत प्रवासाचा प्रस्ताव आणला आहे. ज्यामुळे तिथे पर्यटनाला चालना मिळेल

थायलँडमध्ये Buy International, Free Thailand Domestic Flights अशी योजना जाहीर करण्यात आली आहे.

थाय सरकारकडून देशातंर्गत प्रवासाचा खर्च करण्यात येईल. त्यात एकेरी प्रवास १७५० बाट, राऊंड ट्रीपसाठी ३५०० बाट अनुदान मिळेल

ही उड्डाणे यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज शहरे, प्रसिद्ध पर्यटन स्थळे आणि विविध विविध राज्यांपर्यंत चालवली जातील.

ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ पर्यंत भारतासह इतर देशांतील पर्यटकांना थायलँडचे इंटरनॅशनल तिकिट खरेदी करणाऱ्यांसाठी ही ऑफर आहे

प्रत्येक प्रवाशाला २ फ्री डोमेस्टिक फ्लाईट्स आणि २० किलोपर्यंत बॅगेज अलाऊंस मिळेल. या योजनेमुळे २ लाख परदेशी पर्यटक थायलँडला येण्याचा अंदाज आहे

Click Here