घरातील जिवंत 'बॉम्ब'! AC चा स्फोट होण्याआधीच 'या' गोष्टींची काळजी घ्या

घरातील एसीचा स्फोट झाल्यानं फरिदाबाद इथं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नियमित देखभाल - AC ची नियमित सर्व्हिसिंग आणि देखभाल करून करून घ्या. गॅस लीकेज किंवा इलेक्ट्रिकल फॉल्ट्स तपासा

योग्य वायरिंग -  घरातील इलेक्ट्रिकल वायरिंग मानकांनुसार असावी. जुन्या किंवा सदोष वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते

गॅस लीकेज तपासणी-  एसीमध्ये रेफ्रिजरंट गॅस लीक होत नाही ना, याची खात्री करा. गॅस लीकेजमुळे स्फोटाचा धोका वाढतो

व्हेंटिलेशन - एसी असलेल्या खोलीत पुरेसे व्हेंटिलेशन असावे. बंद खोलीत गॅस साठल्यास धोका वाढतो

सुरक्षित बसवणे -  प्रमाणित टेक्निशियनकडून AC बसवावी. चुकीच्या इन्स्टॉलेशनमुळे गॅस किंवा इलेक्ट्रिकल समस्या उद्भवू शकते

अधिक गरम होणे टाळा -  एसी जास्त वेळ सतत चालवू नका. यामुळे युनिट जास्त गरम होऊन धोका निर्माण होऊ शकतो

प्रमाणित उपकरणे: विश्वासार्ह ब्रँडची एसी आणि त्याचे पार्ट्स वापरावेत. स्वस्त किंवा निकृष्ट उपकरणांमुळे जोखीम वाढते

Click Here