बहुगुणी तुळस! अनेक आजार दूर करणारी संजीवनी

तुळशीच्या पानांपासून ते खोडापर्यंत प्रत्येक भाग हा औषधी आहे.

प्रत्येकाच्या दारापुढे तुळस ही हमखास असते. तुळशीला जसं धार्मिक महत्त्व आहे. तितकंच तिचं आयुर्वेदातही महत्त्व आहे.

तुळशीच्या पानांपासून ते खोडापर्यंत प्रत्येक भाग हा औषधी असून त्यामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात.

ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळते. तसंच लहान मुलांना ताप असेल तर तुळशीच्या तेलाने त्यांची मालिश करावी.

दातदुखी, हिरड्यांना सूज येणे, दातांतून रक्त येणे, दात किडणे या समस्यांवर तुळशीची पाने चघळावीत. 

तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंधी येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता.

त्वचाविकार, फंगल इंफेक्शन झाल्यास अंघोळीच्या पाण्यात तुळशीची काही पाने टाकावीत. यामुळे त्वचाविकार दूर होतात.

डिसेंबरमध्ये हनिमूनसाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणं!

Click Here