ढासू शेअर, 5 वर्षांतच दिला छप्परफाड परतावा!

1 लाखाचे केले 89 लाख रुपये...!

औद्योगिक उत्पादनांच्या उद्योगाशी संबंधित पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतणूकदारांना गेल्या ५ वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे.

या शेअरमध्ये गेल्या 5 वर्षांपूर्वी गुंतवणूक करणारे आता मालामाल झाले आहेत. कंपनीने गेल्या पाच वर्षांत शेअरधारकांना 8915 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.

या शेअरने गेल्या पाच वर्षांत 1 लाख रुपयांचे 89 लाख रुपयांहूनही अधिक केले. या कालावधीत 165 रुपयांचा शेअर जवळपास 15000 रुपयांवर पोहोचला आहे.

पीटीसी इंडस्ट्रीजचा शेअर 3 जुलै 2020 रोजी 165.57 रुपयांवर होता. जो 1 जुलै 2025 रोजी BSE वर 14,926.95 रुपयांवर पोहोचला.

जर एखाद्या व्यक्तीने 3 जुलै 2020 रोजी पीटीसी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तिचे मूल्य 89.93 लाख रुपये झाले असते.

पीटीसी इंडस्ट्रीजच्या शेयरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 17978 रुपये आहे. तर नीचांक 9786.30 रुपये एवढा आहे.

गेल्या एक वर्षाचा विचार करत, या शेअरमध्ये केवळ 6 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. मात्र, गेल्या 4 महिन्यांत या शेअरने 47 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Click Here