श्रावण महिन्यात दानधर्म करणे म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आत्मशुद्धी, सामाजिक बांधिलकी देखील आहे.
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्य केली जातात.
श्रावण महिन्यात भगवान शंकाराची आराधना करण्यात येते. यामुळे फलप्राप्ती हाेते, असे मानतात.
अन्नधान्य, वस्त्र, पाणी, तुप, फळं, शिक्षण साहित्य, व्रत सामुग्री यांचे दान विशेष पुण्यदायी मानले जाते.
गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे खूप महत्त्वाचे आहे. याचबराेबर कपडे दान करणे देखील खूप महत्वाचे आहे.
दान नेहमी मनःपूर्वक आणि निस्वार्थ भावाने करावे, असे सांगितले जाते. एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, असे मानतात.
दान केल्याने गरजू लोकांना मदत मिळते, समाजात समतोल निर्माण होतो. यामुळे श्रावणातील दान फक्त पुण्यच नाही, तर समाजपयाेगी आहे.
श्रावणात दान करताना, आपल्या कुवतीनुसार आणि गरजेनुसार दान करावे. दान करताना कोणताही दिखावा किंवा अहंकार नसावा.
श्रावणात शरीर, मन आणि आत्मा यांचं शुद्धिकरण होतं, असं मानतात. दानधर्म केल्याने कर्मफळ सुधारतं आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा मिळते.
दान केल्याने अहंकार कमी होतो, मनःशांती मिळते आणि आत्मिक समाधान लाभतं.
दान म्हणजे निस्वार्थपणे इतरांना मदत करणं. श्रावणात दान केल्याने ती कृती धार्मिक कार्याशी जोडली जाते आणि यामुळे पुण्य लाभतो, असं मानलं जातं.