पेरु आपल्या शरीरासाठी फायद्याचा असतो. हिवाळ्यात तर त्याचे जास्त फायदे आहेत.
पेरुमधून तुम्हाला विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळते. यामुळे पेरु खायला हवा.
पेरु रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तसेच ते त्वचेसाठी फायदेशीर असते.
आपल्याकडे पेरु कधीही मिळतो. त्याचे उत्पादन वर्षभर असते. पण, तरीही पेरु असलेल्या हंगामामध्ये खाल्यास जास्त फायद्याचे असते.
पेरुचा हंगाम हा हिवाळ्यात असतो. हिवाळ्यात पेरु चवीला आणि आरोग्यासाठी उत्तम असतो.
हिवाळ्यात पेरु अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतो. पण, पेरु रात्री खाणे टाळावे.
हिवाळ्यात पेरु भाजून खाल्यास सर्दी-खाकल्यापासून आपल्याला आराम मिळतो.