चेहऱ्यावर आधी मॉइश्चरायझर लावायचं की सनस्क्रीन?

मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे दोन्ही आल्या चेहऱ्यासाठी फायद्याचे आहे.

मुलींच्या दिनचर्येतील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्किनकेअर. पण, अनेकदा स्किनकेअर म्हणजे चेहऱ्याची काळजी घेताना चुकीचे प्रॉडक्ट्स आधी लावल्यावर चेहऱ्यावर कदाचित त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात.

अनेक लोकांना योग्य क्रमाची माहिती नसते. त्यामुळे जर तुम्ही एका हातात मॉइश्चरायझर व दुसऱ्या हातात सनस्क्रीन घेऊन आरशासमोर उभे आहात आणि विचार करीत असाल की, यापैकी नक्की पहिल्यांदा काय लावायचं? 

त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या सुरू करणाऱ्या प्रत्येकासाठी हा सर्वांत सामान्य मुद्दा आहे.

मॉइश्चरायझरला प्रथम स्थान दिलं पाहिजे आणि सनस्क्रीन ही नंतर लावली पाहिजे.

मॉइश्चरायझर म्हणजे सँडविचच्या आतलं सारण; जे आधी लावलं की, तुमच्या त्वचेला पोषण देतं. तर सनस्क्रीन हे ब्रेडच्या वरच्या स्लाईससारखं असतं; जे सर्व काही एकत्र धरून ठेवतं आणि त्याचं संरक्षण करतं. 

त्यामुळे जर आपण आधी ब्रेडचा वरचा भाग ठेवला (म्हणजे सनस्क्रीन आधी लावलं), तर आतलं सारण नीट बसत नाही.

मॉइश्चरायजर त्वचेला मऊ, हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते; तर सनस्क्रीन सूर्यापासून संरक्षण करते. 

जर तुम्ही आधी सनस्क्रीन आणि मग मॉइश्चरायजर तर मॉइश्चरायजर त्वचेत चांगलं शोषलं जाणार नाही आणि सनस्क्रीन तुमच्या त्वचेचं संरक्षण करू शकणार नाही.

नेहमी प्रथम मॉइश्चरायजर लावा, ते त्वचेत शिरेण्यासाठी एक मिनिटाचा अवधी द्या. नंतर वरून सनस्क्रीन लावा अगदी मानेलाही लावायला विसरू नका. त्याचप्रमाणे बाहेर असताना दर तीन ते चार तासांनी पुन्हा ते लावा.

Click Here