शिवनेरी, रायगडसह राज्यातील ११ आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे.