याला तर पुरस्कार मिळाला पाहिजे!
टेक्सासमध्ये पुरामुळे बाधित झालेल्या १६५ लोकांना वाचवल्यानंतर यूएस कोस्ट गार्डच्या स्कॉट रुस्कानला आता "अमेरिकन हिरो" म्हटले जात आहे.
टेक्सासच्या पुरामध्ये १६५ लोकांना वाचवणाऱ्या स्कॉट रुस्कानचे हिरो म्हणून कौतुक करण्यात आलं.
रुस्कान न्यू जर्सी येथे राहतो आणि पूर्वी केपीएमजीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होता. नंतर २०२१ मध्ये तो यूएस कोस्ट गार्डमध्ये भरती झाला.
रेस्क्यू स्विमर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्कॉट रुस्कान टेक्सासमधील कॉर्पस क्रिस्टी येथे तैनात होता.
२६ वर्षीय रुस्कानने सांगितले की, "मी एक सामान्य माणूस आहे. मी फक्त एक काम करत आहे. मी यासाठीच काम करत होतो"
कोणताही कोस्ट गार्ड रेस्क्यू स्विमर किंवा कोणताही कोस्ट गार्ड पायलट, फ्लाइट मेकॅनिक, कोणीही असते तरी या परिस्थितीत असेच केले असते.
रस्कानने मध्य टेक्सासमधील विनाशकारी पुरातून १६५ लोकांना वाचवले ज्यामध्ये ५१ मुलं होती. हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले बचाव कार्य होते.