आपले पूर्वज कोण, कोणाशी जुळतो भारतीयांचा DNA?

भारतीयांच्या आनुवांशिक रचनेचा उगम यावर एम्स, कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध

भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे

भारतीयांच्या गुणसूत्रांच्या अभ्यासात एक चित्तथरारक बाब समोर आली आहे. आजही भारतीयांमध्ये निएंडरथल आणि डेनिसोवन या प्राचीन मानवजातीशी गुणधर्म जुळतो

निएंडरथल हे मानवाशी अगदी जवळ लुप्त झालेल्या प्रजातीचे प्रतिनिधी आहेत. ते चाळीस ते चार लाख वर्षापूर्वी मध्य आशियामध्ये राहत होते. 

या प्राचीन मानवसमूहांकडून वारशाने मिळालेली जनुकीये माहिती भारतीय लोकांची रोगप्रतिकारशक्ती कशी घडते, कोणते आजार अधिक होतात यावर प्रकाश टाकते. 

या संशोधनानुसार, जगभरातील गैर आफ्रिकन लोकांमध्ये भारतीयांमध्ये सर्वाधिक आनुवांशिक विविधता आढळते. भारतीयांच्या DNA मध्ये ५० टक्के निएंडरथल आणि २० टक्के डेनिसोवन गुणसूत्रे आहेत

हे संशोधन प्रसिद्ध सेल या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून त्यात भारतीयांच्या सांस्कृतिक, सामाजिक, आनुवांशिक इतिहासातील रहस्यांवर प्रकाश पडतो

नवपाषाण काळात शेतीची सुरुवात झाली. मानवाने दगडी हत्यारे, उपकरणांचा वापर करण्यास सुरूवात केली होती

Click Here