शास्त्रज्ञांना सापडले 'बुक ऑफ द डेड' पुस्तक

३,५०० वर्षांपासून स्मशानभूमीत पुरले होते, आता होणार मोठा खुलासा!

इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना ३,५०० वर्षे जुन्या स्मशानभूमीचे उत्खनन करताना 'बुक ऑफ द डेड' या विशेष पुस्तकाची प्रत, ममी, पुतळे आणि इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत.

हे पुस्तक ४३ फूट लांबीच्या पेपिरस स्क्रोलवर लिहिलेले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनी याला एक अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाचा शोध म्हणून वर्णन केले आहे. 

'हे पुस्तक प्राचीन इजिप्शियन ग्रंथांचा संग्रह आहे, जे जीवन आणि आत्म्याच्या मार्गदर्शनाशी संबंधित आहेत, असं म्हटले जाते.

प्राचीन इजिप्शियन लोकांना मृत्यूनंतर दफन करण्याची पद्धत निश्चितच माहित होती, असं दिसून येतं.

यामध्ये मृतांच्या शरीराचे अवयव ठेवण्यासाठी कॅनोपिक जारसह मृतांच्या पुस्तकाचे गुंडाळे होते. असे केल्याने मृत व्यक्तीला नंतरच्या जीवनात जाण्यास मदत होईल, असं मानले जात होते.

मध्य इजिप्तमध्ये हे ३,५०० वर्ष जुने स्मशानभूमी सापडली आहे. त्यात ताबीज, पुतळे, ममी आणि छताचे भांडे आहेत, तसेच ४३ फूट लांबीचा पॅपिरस स्क्रोल देखील आहे, जो खूप चांगल्या स्थितीत आहे.

या स्मशानभूमीबद्दल, इजिप्तच्या सर्वोच्च पुरातन वास्तू परिषदेचे सरचिटणीस मुस्तफा वझिरी म्हणाले की, ते १५५० ईसापूर्व ते १०७० ईसापूर्व दरम्यानचे आहे. मृतांचे पुस्तक ४३-४९ फीड लांब आहे, असे मानले जाते .

'लाईव्ह सायन्स'शी बोलताना, जर्मनीच्या रोमर आणि पेलिझायस संग्रहालयाच्या सीईओ लारा वीस म्हणाल्या की, जर हे पुस्तक इतक्या वर्षांनंतरही चांगले जतन केले गेले असेल तर ते खरोखरच एक मोठा शोध आहे.

Click Here