चिकू म्हणजे 'सुपर फ्रूट'...! 

तुम्हाला क्वचितच माहीत असतील याचे हे भन्नाट फायदे...!

चिकू एक सुपर फ्रूट अथवा उत्तम फळ आहे, यात अनेक पषण तत्वे आडळतात. जे आपल्या शरिराला बळकट बनवतात.

यात नैसर्गिक शुगर, विटॅमिन्स, मिनरल्स, आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. 

चिकूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पचनक्रिया चांगली होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. परिणामी पोटाचे आरोग्य चांगले राहते.

चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि आयर्न मोठ्या प्रमाणावर असते. यांमुळे हाडे मजबूत होतात. लहान मुलांच्या हाडांच्या विकासाच्या दृष्टीनेही हे फळ अत्यंत उपयोगी आहे.

चिकू खाल्याने त्वचा चांगली राहते. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते. जे त्वचेसाठी चांगले असतात.

चिकूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच, शिवाय इतर आजारही दूर राहतात. 

चिकूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवतात. शिवाय सर्दी, खोकला आणि फ्लूपासून सरंक्षण करते. 

चीकू हे अशक्तपणा दूर करून शरीराला उर्जा  देणारे फळ आहे. याचे नियमितपणे सेवन केल्याने शरीर अॅक्टिव्ह राहते.

टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!

समोशाला इंग्रजीत काय म्हणतात? नाही माहीत? जाणून घ्या

Click Here