या देशात आहे समोसावर बंदी; जाणून घ्या

आपल्या देशात समोसा खाणाऱ्यांची मोठी संख्या आहे.

आपल्या देशात समोसा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, एका देशात समोसा खाण्यावर बंदी आहे.

होय, समोसा खाण्यावर बंदी आहे. हे वाचून तुमचा विश्वास बसला नसेल.

हा प्रश्न आहे असा कोणता देश आहे ज्यामध्ये समोसा खाण्यावर बंदी आहे? हा प्रश्न ऐकला की सुरुवातीला कुणालाही विश्वास बसणार नाही की असा देश ही असू शकतो जिथे समोसाला बंदी आहे. 

आफ्रिकेतील सोमालिया या देशात वर्ष 2011 पासून समोसा बनवणे आणि खाणे यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी तेथील दहशतवादी संघटना अल-शबाब यांनी घातली. 

या संघटनेने समोशाचा त्रिकोणी आकार ख्रिश्चन धर्मातील त्रिमूर्तीच्या प्रतीकाशी जोडला, तो इस्लामविरोधी असल्याचे घोषित केले. या संघटनेच्या नियंत्रणाखालील भागांमध्ये समोसाला बंदी आहे.

भारतामध्ये समोसा हा अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. चहा आणि समोशाची जोडी ही अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रस्त्याच्या टपऱ्यांपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत सर्वत्र समोसा सहज उपलब्ध होतो. 

त्यामुळे एखाद्या देशात या पदार्थावर बंदी असल्याचं ऐकून लोकांना आश्चर्य वाटणं साहजिकच आहे.

Click Here