सई ताम्हणकरची मान्सून ट्रिप

 नयनरम्य धबधबा आहे तरी कुठे?

गारवा, हिरवळ, आणि पावसाच्या सरी यांचा आनंद घेत अनेक जण आता भटकंतीच्या मूडमध्ये आहेत.

अशातच मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर ही पावसाळी वातावरणाचा आनंद घेताना दिसली.

सईनं इन्स्टाग्रामवर तिच्या मान्सून ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या मित्रमंडळींसह फिरायला गेली होती.

तिनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नयनरम्य धबधबा दिसून येतोय.  सईच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तो भंडारदरा येथील वसुंधरा धबधबा असल्याचं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

सईला फिरण्याची फार आवड आहे. त्यामुळे ती नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.

 जीम, योगा आणि योग्य आहाराचा आधार घेत सईने स्वतःला फिट अँण्ड फाईन ठेवले आहे.

Click Here