हजाराे किलाेमीटर दूरवर वाळूचं वाळवंट पसरलं आहे, त्यामध्ये फक्त एकच झाड ताठ उभे आहे, असं सांगितलं तर खरं वाटेल का?
दूरदूरवर कुठे पाणी नाही, मातीचा अंश नाही, तरीही एक झाडं दिमाखात उभ आहे, हा किती माेठा धडा आहे माणसाला.
आफ्रिकेतील Sahara Desert मध्ये असं झाड होतं. त्याला म्हणायचे Tree of Ténéré.
आजूबाजूला पाणी नाही, दुसरं झाड नाही, तरीही ते शेकडो वर्षं जिवंत राहिलं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही ते एकटं उभं हाेतं.
हे झाड प्रवाशांसाठी दिशा दाखवणारं चिन्ह होतं. वाळवंटात हरवलेल्या लोकांसाठी एकमेव आधार हाेतं.
शास्त्रज्ञांच्या मते त्याच्या मुळांची लांबी 35 मीटरपेक्षा जास्त होती. म्हणूनच ते खोलवरचं पाणी शोषून जगत होतं.
१९७३ मध्ये मात्र दुर्दैव घडलं. एका ट्रकने धडक दिल्याने हे झाड कोसळलं.
आज ते झाड संग्रहालयात जतन केलं आहे. जिथं ते उभं होतं, तिथं आता धातूचं स्मारक आहे.
जगभरातून लोक अजूनही त्याला भेट देतात. कारण ते केवळ झाड नव्हतं, तर निसर्गाचा चमत्कार होतं.
त्याला ओळखलं जातं जगातील सर्वात एकटं झाड म्हणून. एकाकीपणात ही उभं राहिलेलं प्रतीक.
हे झाड आपल्याला शिकवतं एकटं असलं तरी जगता येतं, फक्त जिद्द हवी.