सचिन तेंडुलकरचे ७ अभेद्य वर्ल्ड रेकॉर्ड

सचिनचे हे वर्ल्ड रेकॉर्ड आजही मोडणे अशक्य!

क्रिकेटचा ‘देव’ Sachin Tendulkar चा आज ५३वा वाढदिवस. २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनने असे अनेक विक्रम प्रस्थापित केले, जे आजही अभेद्य मानले जातात. 

सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा करण्याचा विक्रम आहे. सचिनने १९८९ ते २०१२ दरम्यान आपल्या करिअरमध्ये ४६३ सामने खेळले आहेत.

सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, जो आजही विक्रम आहे. या विक्रमाच्या जवळ महेलि जयवर्धने (६५२ सामने) आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. विराट कोहली सध्या ८५ शतकांवर आहेत. सचिनचा विक्रम मोडणे कठीण मानले जाते.

सचिनने नोव्हेंबर १९८९ मध्ये पदार्पण केले आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये शेवटचा सामना खेळला. त्याची कारकीर्द तब्बल २४ वर्षे १ दिवस चालली, हा एक अनोखा विक्रम आहे.

सचिनने ६६४ सामन्यांच्या ७८२ डावांत ३४,३५७ धावा केल्या. जगात आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने ३०,००० धावांचा टप्पा गाठलेला नाही. 

सचिन एकमेव खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत. सध्या जो रूटच्या नावावर ४१ शतके आहेत. 

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६२ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. विराट कोहली ४५ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

Click Here