तल्लीन होऊन भक्तीरसात रमली, खेळली फुगडी
सध्या संपूर्ण महाराष्ट्र वारीच्या गजरात दुमदुमला आहे. दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे.
'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही यंदा वारीत सहभागी झाली. तिच्यासोबत तिचे वडीलही होते.
रिंकूनं २० वर्षांनंतर वारीचा अनुभव घेतला.
रिंकूनं ४ वर्षांची असताना तिच्या वडिलांसह पहिल्यांदा वारी अनुभवली होती.
वारीतील रिंकू राजगुरुचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
हिरवी नऊवारी साडी, नथ, केसात गजरा, गळ्यात टाळ अशा पारंपरिक पेहरावात ती दिसली.
यावेळी रिंकूने वारकऱ्यांसोबत भजनगायन केलं, त्यांच्यासोबत फुगडीसुद्धा खेळली.
तर कपाळी केशरी गंध, हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेत तिने ही पायवारी केली.
Your Page!