शेवटच्या दिवसातही मगरींची शिकार करणारी रणथंबोरची वाघीण
राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रसिद्ध वाघिणींपैकी एक 'अॅरोहेड' (T-84) हिचे वयाच्या १४ व्या वर्षी निधन झाले आहे.
तिच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो पाहून लोकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या आयुष्यातील शेवटच्या तासांची झलक दिसली.
२०२३ मध्ये, तिला ट्यूमर असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. फेब्रुवारी २०२४ मध्ये तिला पुन्हा कर्करोग झाला. या आजारांमध्येही, तिने जबाबदारीने तीन पिल्लांचे संगोपन सुरू ठेवले.
अॅरोहेडच्या मृत्यूच्या आधी वन्यजीव छायाचित्रकार सचिन राय यांनी हा व्हिडीओ काढला होता. राय यांनी लहानपणापासून अॅरोहेडच्या हालचाली टिपल्या होत्या.
१७ जूनच्या संध्याकाळी अॅरोहेडच शेवटचा प्रवास होता. तिला उठण्यासाठी धडपडताना आणि कमकुवत पावले टाकताना आणि नंतर पुन्हा पडताना पाहून खूप वाईट वाटले, असं राय म्हणाले.
मी अॅरोहेडचे आयुष्य खूप जवळून पाहिले. ती लहान बाळ असल्यापासून ते तिच्या आईचा प्रदेश जिंकून एक शक्तिशाली वाघिणी बनण्यापर्यंत, मी तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा पाहिला.
तिच्या दुसऱ्या अपत्यांपैकी एक 'रिद्धी', जिने नंतर अॅरोहेडला त्याच प्रदेशातून हाकलून लावले, तिचा जन्मही माझ्या डोळ्यांसमोर झाला. हे निसर्गाचे चक्र होते, जे तिच्यासमोर पूर्ण झाले.
योगायोग असा होता तिची बछडी वाघिण कनकती हिला सकाळी ११ वाजता दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले आणि दुपारी १ वाजता तिचा मृतदेह रेंजर्सना दिसला.
ती इतकी धाडसी होती की आजारपणाच्या या अवस्थेतही तिने काही दिवसांपूर्वी एका मगरीला मारले होते. त्यामुळे ती खऱ्या जंगली वाघिणीचे उदाहरण होती. (फोटो-सचिन राय)