'रामायण' या सिनेमाचा पहिलावहिला टीझर रीलिज करण्यात आलाय.
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश याच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
बहुप्रतिक्षित 'रामायण' या सिनेमाचा पहिलावहिला टीजर रीलिज करण्यात आला.
टीजर पाहिल्यावर हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरणार असल्याचं बोललं जातं आहे.
कारण, 'रामायण'चं VFX हे ८ वेळा अकॅडमी पुरस्कार विजेते असलेल्या जगप्रसिद्ध DNEG या स्टुडिओद्वारे तयार केले जात आहेत.
हँस झिमर आणि ए. आर. रहमान हे मोठे संगीतकार या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
यासोबतचं टेरी नोटरी आणि गाय नॉरिस हे अॅक्शन सीन दिग्दर्शित करणार आहेत.
रवि बन्सल आणि रॅम्सी एव्हरी यांनी प्रोडक्शन डिझाइनची जबाबदारी सांभाळली आहे.
त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणार यात शंका नाही.
'रामायण: द इंट्रोडक्शन' या नावाने चित्रपटाचा पहिला भाग पुढील वर्षी रीलिज होईल. तर २०२७ च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.