रेबीजपासून सावधान; ठरू शकतो जीवघेणा

पहिले 24 तास सर्वात महत्त्वाचे!

रेबीज हा वायरल संसर्ग असून तो प्रामुख्याने कुत्रा, मांजर, कोल्हा, वटवाघुळ यांसारख्या प्राण्यांच्या चावण्याने होतो. संक्रमित प्राण्याच्या लाळेतून हा शरीरात प्रवेश करतो.

संक्रमित व्यक्तीमध्ये सुरुवातीला ताप, डोकेदुखी, थकवा, जखमेच्या ठिकाणी मुंग्या येणे, जळजळ, पाणी पिण्याची भीती, आकडी अशाप्रकारची लक्षणे दिसू शकतात.

संक्रमण झाल्यावर ताबडतोब जखम किमान 15 मिनिटे साबण व पाण्याने धुवावी. जखम धुतल्यानंतर लगेचच जवळच्या दवाखान्यात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

रेबीजविरोधी लस वेळेवर घेतल्यास संसर्ग टाळता येतो. गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टर रेबीज इम्युनोग्लोब्युलिन देतात, ज्यामुळे विषाणूचा प्रसार थांबतो. 

प्रतिबंधात्मक उपाय- पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण, भटक्या प्राण्यांपासून दूर राहणे, चावा किंवा ओरखडा लपवू नये, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

रेबीजची लक्षणे दिसू लागल्यानंतर उपचार शक्य नसतात, म्हणून वेळेत लस घेणे हेच जीव वाचवण्याचे शस्त्र आहे. उपचार न झाल्यास रेबीज नेहमी प्राणघातक ठरतो.

भारत हा जगातील रेबीजच्या जास्त प्रकरणांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. WHO ने 2030 पर्यंत कुत्र्यांमुळे होणारा रेबीज मृत्यू शून्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Click Here