आजकाल बहुतांश लोकांना डँड्रफच्या (कोंडा) समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र, काही नैसर्गिक साहित्यांपासून तयार केलेल्या तेलाने यावर मात करता येऊ शकते.
तुळस - तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे केसांना मुळापासून मजबूत बनवतात.
कापूर - कापूर केसांसाठी अँटी-इंफ्लेमेंटरी असतो, जो खाज आणि सूज कमी करतो.
नारळाचे तेल - हे तेल केसांना पोषण देते आणि ते मऊ बनवते.
तेल तयार करण्याची पद्धत - कापूर नारळाच्या तेलात विरघळून ते गरम करा. यानंतर त्यात तुळशीची पाने चुरगळून टाका आणि मग ते मिश्रण उकळवा.
यानंतर तयार झालेले मिश्रण गाळून थंड करा आणि एका चांगल्या बाटलीत भरून ठेवा. आठवड्यातून २-३ वेळा त्याने डोक्याची मालीश करा.
लाभ - या तेलाचा नियमित वापर केल्यास डँड्रफ कमी होईल आणि केसांचे आरोग्यही सुधारेल.
नोट - हा उपाय सर्वसामान्य माहितीच्या आधारे सांगण्यात आला आहे. आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.