अजिंठ्यापूर्वीची चित्रकला; पितळखोरा लेणीतील अद्वितीय दुनिया

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळ अभयारण्यातील छुपे कलादालन

 पितळखोरा लेणी कन्नडजवळील गौताळ अभयारण्यात वसलेली असून ती इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील आहे.

पितळखोरा १४ बौद्ध लेण्यांचा समूह आहे, ज्यांपैकी ५ चैत्यगृह आणि उर्वरित विहार आहेत

मुख्य चैत्यगृहासमोरच्या पायवाटेस, मुख्य प्रवेशद्वाराजवळ युद्धद्वारपाल (द्वाररक्षक), हत्तीशिल्प आणि यक्ष मूर्त्या आढळतात 

या लेण्यात इ.स.च्या दुसऱ्या शतकात बौद्ध महायान/ महासांघिक पंथाच्या प्रभावाखाली भित्तिचित्रे तयार करण्यात आली.

विशेष म्हणजे, अजिंठा लेणीच्या आधीची भित्तिचित्रे पितळखोरा लेण्यात आढळतात.

सम्यक समबुद्ध व बोधिसत्त्व यांची सुंदर चित्ररचना या लेण्यात करण्यात आली आहे.

लेणीतील भित्तिचित्रे तीन वेगवेगळ्या प्रकारांची आहेत, हे याचे वैशिष्ट्य आहे.

 या लेण्या कन्नड शहरापासून २० किमीवर आहेत. सार्वजनिक आणि खाजगी गाडीने येथे जाता येते.

Click Here