बॉस लेडी! एकदा फोटो बघाच...

प्राजक्ता कोळीचा हटके स्वॅग, खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

लाडकी यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने तिच्या 'Mostlysane' या इन्स्टाग्राम हँडलवर नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने एक आकर्षक आणि आधुनिक ओव्हरसाईज्ड डबल-ब्रेस्टेड सूट परिधान केला आहे.

प्राजक्ताने आपल्या नेहमीच्या साध्या, पण प्रभावी मेकअप आणि हेअरस्टाईलने हा लूक पूर्ण केला आहे.

तपकिरी रंगातील या सूटमध्ये ती स्टायलिश दिसतेय.

सनग्लासेस हे तिच्या एकंदर लूकला एक रॉयल आणि क्लासी टच देत आहे.

या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

प्राजक्ता लवकरच 'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम'  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

प्राजक्ताचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. याआधी तिने विविध हिंदी वेब सीरिज, चित्रपट आणि युट्यूब व्हिडिओंच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Click Here