नुकताच देशात यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
UPSC परीक्षा २०२४ च्या अंतिम निकालात एकूण १,००९ उमेदवारांना यश मिळाले आहे.
या निकालात पूर्वा चौधरी असं नाव आहे, जिने ५३३ वा क्रमांक मिळवून कुटुंबाची मान उंचावली आहे.
पूर्वा चौधरीचे यश केवळ तिच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यापुरते मर्यादित नाही तर ते सोशल मीडियावरही पसरले आहे.
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करते
पूर्वा चौधरीने तिचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्समधून पूर्ण केले आहे. यानंतर, तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
पूर्वा चौधरी करण जोहरच्या चित्रपटांमधील अभिनेत्रीसारखी दिसते असं कौतुक इंटरनेट युजर्सकडून करण्यात येत आहे.