दोन दिवसांपासून अनेकांच्या फोन कॉलिंगचे स्क्रिन बदलले आहे.
गुगलने त्यांचे फोन अॅप अपडेट केले आहे. नवीन अपडेटनंतर, अॅपचा UI बदलला आहे .
गुगलने हे अपडेट जारी केले आहे, त्यानंतर डायलरचे स्वरूप बदलले आहे. नवीन डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
अलीकडील टॅब एका होम टॅबने बदलला आहे, तिथे तुम्हाला तुमचे फेवरेट संपर्क वरच्या बाजूला मिळतील, तर इतर तळाशी असतील.
जेव्हा कॉल येतो तेव्हा तुम्हाला मध्यभागी फोन आयकॉन दिसतो. तुम्ही उजवीकडे स्वाइप करून कॉल रिसिव्ह करू शकाल, तर डावीकडे स्वाइप करून कॉल डिस्कनेक्ट होईल.
मुख्य स्क्रीनवर, वापरकर्त्यांना होम आणि कीबोर्डचा पर्याय मिळेल. दोन्हीवर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या डॅशबोर्डमध्ये प्रवेश करू शकाल.
या अपडेटनंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. लोक विविध प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत, त्यांचा आरोप आहे की गुगलने हे गुप्तपणे केले आहे.
गुगलने या प्रकरणात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. कधीकधी कंपनी काही न अलर्ट देताच अपडेट करत असते.
हे अपडेट सर्व्हरकडून होतात. असे अपडेट्स विशेषतः UI आणि काही नवीन फिचरसाठी जारी केले जातात.
ऑटो अपडेट्स आणि बॅकग्राउंड अपडेट्समुळे देखील हे होऊ शकते. गुगलचे हे डिझाइन अपडेट मटेरियल ३ एक्सप्रेसिव्हचा एक भाग आहे.