१० लाखांत मेसीसोबत काढा एक फोटो

फक्त १०० चाहत्यांसाठी अर्जेंटिनाच्या सुपरस्टारची भेट. 

फुटबॉलचा सुपरस्टार लिओनल मेसीची बहुप्रतिक्षित 'द गोट टूर' १३ डिसेंबरपासून सुरू होत असून, तो भारतातील चार प्रमुख शहरांना भेट देणार आहेत.

मेसी हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर मेसी एका फुटबॉल सामन्यात सहभागी होईल ज्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीसुद्धा खेळणार आहेत.

या ऐतिहासिक दौऱ्यात मेसीसोबत खास भेट आणि फोटो काढण्यासाठी चाहत्यांना सुमारे १० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव, तसेच मेसीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे, देशभरातील केवळ १०० लोकांनाच 'मीट अँड ग्रीट' सेशनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

मेसी आधी कोलकाता येथे सकाळी उतरणार त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच सौरव गांगुली यांच्यासोबत त्याची औपचारिक भेट होईल.

हैदराबादच्या उप्पल स्टेडियममध्ये मेसी, सुआरेज आणि डी पॉल यांच्या ऑल स्टार्स टीमसोबत २० मिनिटांचा विशेष फुटबॉल सामना खेळला जाईल.

या खास सामन्यात मेसी यूनिसेफचा दूत म्हणून गरीब आणि प्रतिभावान मुलांना फुटबॉल खेळण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.

मुंबईत मेसी एका चॅरिटी कार्यक्रमासाठी हजेरी लावणार असून २०२२ वर्ल्ड कपमधील काही महत्त्वपूर्ण वस्तूंचा लिलाव करून निधी गोळा करणार आहे.

मेसी हैदराबादमध्ये एक रात्र थांबणार असून, त्याच्या सन्मानार्थ त्याच दिवशी स्टेडियममध्ये एका भव्य म्युजिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील या 'द गोट टूर'चा समारोप नवी दिल्ली येथे होणार असून, त्यावेळी लिओनल मेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Click Here