टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे.
पलक तिच्या सोशल मिडियावरील पोस्टने नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
पलक ही नुकत्याच पार पडलेल्या Bombay Times Fashion Week मध्ये सहभागी झाली होती.
या फॅशन वीकमध्ये तिनं रॅम्प वॉक केला. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
डिझायनर लेबल चेरी डी साठी फॅशन शोमध्ये पलक शोस्टॉपर बनली.
पलकने ट्यूब टॉप स्टाईल ब्लाऊज घातला आहे, तसेच तिचा लेहेंग्यावर मोती वर्क करण्यात आहे होते. तिने दोन्ही हातांवर ऑर्गेन्झा दुपट्टा कॅरी केला, त्याच्या बॉर्डरवर फुलांचे कटआउट डिझाइन होते.
तिच्या मोत्याच्या लेहेंग्याच्या लूकला स्टाईल करण्यासाठी, पलकने मोत्याचे दागिने घातले.
तिचा हा लेहेंग्यातील देसी लूक खूप ग्लॅमरस दिसत असला तरीही, तिचे अॅब्स आणि कॉलर बोनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
ड्रेसिंगच्या बाबतीत पलक तिवारीने तिची आई श्वेता तिवारीचे अनुकरण केले असल्याचे दिसून येते.
तिच्या या रॅम्प वॉकचे काही लोकांनी कौतुक केले तर काहींनी तिच्यातील कमतरतेवर बोटं ठेवले आहे.