-५२°C मध्येही 'इथे' भरते शाळा! 

पृथ्वीवर काही ठिकाणी तापमान शून्याखाली जातं. पण जगातलं सर्वात थंड वस्तीचं ठिकाण कुठे आहे, माहित आहे का?

जगातलं थंड हवेच ठिकाण म्हणजे ओयम्याकॉन (Oymyakon). साइबेरिया, रशियातलं छोटंसं खेडं. अजूनही लोक अजूनही तिथं राहतात. 

ओयम्याकॉनमधील तापमान हिवाळ्यात - ५०°C ते - ६०°C पर्यंत घसरतं. १९३३ मध्ये तर इथे -६७.७°C नोंदवलं गेलं होतं. 

इथं इतकं थंडीचं साम्राज्य आहे की शाई लगेच गोठते. गाड्या रात्रभर बाहेर ठेवल्या तर इंजिन गोठतं. म्हणून लोक नेहमी इंजिन गरम ठेवतात.

या खेड्यात सूर्यप्रकाशही मर्यादित असतो. हिवाळ्यात अनेक आठवडे सलग अंधाराचं राज्य असतं. तरीही लोक जगतात.

लोकांचा मुख्य आहार मांसावर आधारित आहे. कारण इथं भाजीपाला उगवतच नाही. मासे, गोमांस, रेनडिअर हेच त्यांचं प्रमुख अन्न.

शाळा -५२°C पर्यंत उघड्या राहतात. त्यापेक्षा थंडी वाढली तरच सुट्टी जाहीर होते.

इथल्या नद्या, तळी महिनोनमहिने पूर्ण गोठलेली असतात. लोक बर्फ फोडून मासेमारी करतात.

ओयम्याकॉनला जगभरातून पर्यटक येतात. फक्त अनुभव घ्यायला. मानवी सहनशक्तीच्या टाेकाला पाेहचलेली जीवनशैली.

Click Here