कार चालवताय? सरकारचं नवं फर्मान वाचा; लवकर मोबाईल नंबर अपडेट करा

वाहन परवाना धारकांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं काढली सूचना 

सध्याच्या डिजिटल युगात सरकार लोकांसाठी अशा सुविधा आणत आहे ज्यामुळे लोकांना वारंवार सरकारी कार्यालयात जाण्याची वेळ येणार नाही

वाहन परवानाधारक आणि वाहन मालकांना त्यांचे मोबाईल क्रमांक 'VAHAN' आणि 'SARATHI' पोर्टलवर अपडेट करण्यास सांगितले आहे

मोबाईल नंबर अपडेट करण्याचे काम आता ऑनलाइन होणार असून त्यातून वेळेची बचत आणि ही प्रक्रियाही सुलभ होण्यास मदत होईल.

सरकारने दिलेल्या पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. त्यात दिलेली माहिती OTP सह भरून नंबर अपडेट करता येईल.

ही प्रक्रिया करताना वाहन रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन तारीख, चेसिस नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म तारीख ही माहिती संपूर्ण भरावी लागेल

जर ऑनलाइन करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जवळच्या आरटीओ कार्यालयात देखील जाऊ शकता

मोबाईल नंबर अपडेट केल्यानवर परवाना आणि वाहनाशी संबंधित माहिती वेळेवर आणि अचूकपणे मिळेल असं सांगण्यात आले आहे

Click Here