एकदा चार्ज केल्यावर लॅपटॉपची बॅटरी देईल चांगला बॅकअप; या गोष्टी लक्षात ठेवा

लॅपटॉपची बॅटरी लगेच कमी होणे या समस्या अनेकांना येतात. 

जर तुम्ही दररोज लॅपटॉप वापरत असाल आणि बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची काळजी करत असाल तर तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवाव्यात.

जर तुम्ही तुमचा लॅपटॉप योग्यरित्या वापरला आणि त्याची काळजी घेतली तरच बॅटरी बराच काळ टिकेल.

जे लोक २०:८० नियम विसरतात ते अडचणीत येतात, त्यांनी हा नियम लक्षात ठेवा आणि बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका.

नियमानुसार बॅटरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आणि २० टक्क्यांपेक्षा कमी नसावी.

बॅटरी तपासा आणि जर बॅटरी फुगली असेल तर कोणताही विलंब न करता ताबडतोब बॅटरी बदला.

काही अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, यामुळे बॅटरीचा वापर हळूहळू पण निश्चितच वाढतो. बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अ‍ॅप्स बंद करा.

सिस्टममध्ये ओव्हरहिटींग झाल्यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो.

Click Here