प्रवाशांना नको असलेली सीट ठरली जीव वाचवणारी
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी वाचला आहे. तर इतर २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला.
रमेश विश्वास म्हणाले की, अपघातानंतर मोठा स्फोट झाला, सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरल्या. मी जिवंत आहे यावर माझा विश्वासच बसत नाही.
विश्वास कुमार वाचण्याचे एक मोठे कारण त्यांची सीट म्हणजेच 11A होती. त्यामुळे ते जिवंत आहेत.
अनेकदा प्रवासी या सीटवर बसणे टाळतात. मात्र त्याच सीटने विश्वास कुमारचा जीव वाचवला.
एअर इंडियाच्या विमानांमध्ये, पुढच्या भागात बिझनेस क्लास असतो. त्यानंतर, इकॉनॉमी क्लासच्या जागा असतात.
बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे. सीट क्रमांक ११ तिथून सुरू होते आणि दरवाजाच्या शेजारील सीट 11A आहे.
11A ही सीट दरवाज्याच्या अगदी मागे आहे, जी संकटाच्या वेळी बाहेर पडण्यासाठी आहे. रमेश कुमार येथूनच बाहेर आला.
विमानाच्या दरवाज्याजवळच सीट 11A होती. त्यामुळे विमान अपघातादरम्यान रमेश विश्वास कुमार यांना बाहेर पडणे सोपे झाले.
11A आणि 11F वरील जागा विमानाच्या अगदी मध्यभागी असल्याने आणि विमानातून सर्वात शेवटी उतरावं लागत असल्यान प्रवासी त्या टाळतात.