बॉलिवूड अभिनेत्री ज्यांची सुरुवात शून्यांपासून झाली व आता त्यांनी अनेक क्षेत्रांत मोठा टप्पा गाठला आहे.
१६ व्या वर्षी अभिनेत्री असलेली रविना टंडन आज पद्मश्री पुरस्कार विजेती, पर्यावरणप्रेमी, व महिलांच्या हक्कांसाठी लढणारी यशस्वी अभिनेत्री आहे.
२१ व्या मिस वर्ल्ड झालेली ऐश्वर्या आज ५१ व्या वर्षी ‘ग्लोबल इंडियन ऑफ द इयर’ पुरस्कार विजेती व कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी सदस्य आहे.
बाल कलाकार असलेल्या रेखाने १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं, ‘रोल मॉडेल ऑफ द इयर’ आणि ‘एडिटर्स चॉईस आयकॉन’ सन्मानाने तिला गौरवण्यात आले.
मिस युनिव्हर्स असलेली सुष्मिता आज वयाच्या ४९ व्या वर्षी समाजसेविका, प्रेरणादायी वक्ता व ओटीटी स्टार आहे.
दिव्या दत्ता उत्तम अभिनेत्रीसोबतच राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि लेखिका देखील आहे.
मिस युनिव्हर्स ते अभिनेत्री, निर्माती, उद्योजिका आणि UNFPA ची गुडविल अॅम्बेसडर म्हणून लारा दत्ताचा प्रवास खूपच खास होता.
टीव्ही अभिनेत्री असलेली मंदिरा बेदी वयाच्या ५३ व्या वर्षी स्पोर्ट्स प्रेझेंटर, फॅशन डिझायनर आणि फिटनेस आयकॉन आहे.
प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि आज ती ग्लोबल सेलेब्रिटी आहे.
विद्या बालनने करिअरची सुरुवात सिरियलमधून केली, आणि आज ती दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.
कंगनाने फारच कमी वयात घर सोडलं आणि स्वतःच्या हिमतीवर मॉडेलिंग, अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. कंगना खासदार म्हणून देखील काम करत आहे.