जाणून घ्या, हे ५ खास घरगुती उपाय...
अनेक वेळा दातदुखीची समस्या एवढी वाढते की, साधे पाणी पिणेही अवघड होते.
दात दुखीची अनेक कारणे असू शकतात.
यात, दातांची स्वच्छता, संवेदनशीलता आणि कॅल्शियमच्या कमतरतेचाही समावेश होतो.
तर जाणून घेऊयात, दातदुखीला पळवून लावण्याचे काही खास घरगुती उपाय...
कोमट पाण्यात रॉक सॉल्ट मिसळून चूळ भरल्यास दातदुखीपासून आराम मिळतो.
लवंगाचे तेल दात अथवा हिरड्यांवर ठेऊ शकता. यात असलेले अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म दातदुखीपासून आराम देतात.
याशिवाय, हळद, मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र करून दातांवर लावा.
लसून आणि लवंगाचे पेस्ट दातांवर लावा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात.
लिंबाचा रस आणि हिंगाचे पेस्ट दातांवर लावल्यास ताबडतोब आराम मिळतो.