तुम्ही कधी विचार केला आहे का की एका भिकाऱ्याकडे लाखो नाही तर करोडो रुपये असू शकतात.
भरत जैन हे भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी आहेत. भरत हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत भिकारींपैकी एक आहे.
भरत जैन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानात भिक मागतात. ते जवळजवळ ४० वर्षांपासून भिक मागत आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, भरत जैन आज आपल्या कुटुंबासह कोट्यवधी रुपयांच्या घरात राहतात. ते भिक मागून दररोज २५०० रुपये कमावतात. ते फक्त भिक मागत नाही तर हे पैसे हुशारीने गुंतवतात.
बुर्जू चंद्र यांचा रेल्वे स्टेशनवर मृत्यू झाला तेव्हा त्यांची संपत्ती उघडकीस आली. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांच्या घरातून लाखो रुपयांची रोकड सापडली.
लक्ष्मी दास गेल्या अनेक वर्षांपासून कोलकातामध्ये भीक मागत आहे. तिने अगदी लहान वयातच भीक मागायला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती भीक मागून महिन्याला ३० हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करते.
कृष्ण कुमार गीते मुंबईत आपल्या भावासोबत भिक मागतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते भिक मागून दिवसाला १५०० रुपये कमवतात.
पप्पू कुमारकडे सुमारे १.२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका अपघातात त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले. त्यानंतर तो भीक मागू लागले. त्यांनी भीक मागून इतके पैसे कमवले आहेत की ते लहान व्यावसायिकांनाही कर्ज देतात.
मलाना खान आणि सर्वतीया देवी देखील भिक मागून दररोज शेकडो रुपये कमवतात. त्यांच्याकडे लाखो रुपयांची बचत आहे.