दिल्ली-मुंबई नाही, ही शहर आहेत विवाहबाह्य संबंधात पहिल्या क्रमांकावर
कोल्डप्लेवरील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे विवाहबाह्य संबंधांबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.
मॅरेज डेटिंग प्लॅटफॉर्म अॅशले मॅडिसनने जून २०२५ आधारित डेटा जारी केला आहे. हा अहवाल देशातील वेगाने वाढणाऱ्या अफेअर्सबद्दल आहे.
नवीन आकडेवारीनुसार, तामिळनाडूतील कांचीपुरमने या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे आणि विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणांमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.
या वैवाहिक संबंध प्लॅटफॉर्मवर साइन अप करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या वर्षी हे शहर या यादीत १७ व्या क्रमांकावर होते.
अॅशले मॅडिसनच्या टॉप २० भारतीय शहरांच्या यादीत दिल्ली-एनसीआरमधील नऊ ठिकाणांचा समावेश आहे.
यामध्ये दिल्लीचे सहा जिल्हे समाविष्ट आहेत - मध्य दिल्ली, दक्षिण पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली.
यासोबतच, शेजारील शहरे गुडगाव, गाझियाबाद आणि नोएडा यांनीही या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
१. कांचीपुरम, २. मध्य दिल्ली, ३. गुरुग्राम, ४. गौतम बुद्ध नगर, ५. नैऋत्य दिल्ली, ६. देहारादून, ७. पूर्व दिल्ली, ८. पुणे, ९. बेंगळुरू, १०. दक्षिण दिल्ली