मुंबई लोकलमध्ये सध्या चोरीचा नवा फंडा पाहायला मिळत आहे. केवळ ३ सेकंदात मोबाईल गायब केले जात आहेत.
मुलुंड ते दादर दररोज पाच प्रकरणं समोर येत असून चोरटे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करत आहेत
हे चोरटे २-३ लोकांच्या गटात ट्रेनमध्ये चढतात. यातील एकजण ढकलतो, दुसरा मोबाईल काढतो आणि खाली काहीतरी पडल्याचे नाटक करुन तो लांबवतो.
या चोरट्यांचे खास टार्गेट सायंकाळची गर्दी, महिलांचे डब्बे आहेत. हार्बर आणि सेंट्रल लाईनवर चोरीच्या सर्वात जास्त घटना घडत आहेत.
चोरीची प्रकरणे वाढल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढवण्यात आलं आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे काही चोरट्यांना ताब्यातही घेण्यात आलं.
असे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी प्रवास करताना मोबाईल खिशाऐवजी बॅगमध्ये ठेवावा आणि गर्दीत सतर्क राहावे.
तसेच संशयास्पद हालचालींचं रेकॉर्डिंग करावं. तुमच्या माहितीमुळे कुणाचं नुकसान वाचू शकतं. रेल्वे पोलिसांच्या 182 या क्रमांकाशीही तुम्ही संपर्क साधू शकता.