नवीन फिचर, नवा लूक स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमत किती?

इलेक्ट्रिक स्कूटर टेनिस १५०० नवीन फिचरसह आणि दोन नवीन कलरसह पुन्हा लाँच केली आहे.

VLF India ने कंपनीने त्यांची प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर Tennis 1500  नवीन फिचरसह आणि दोन नवीन कलरसह पुन्हा लाँच केली आहे.

अपडेटेड मॉडेलची एक्स-शोरूम किंमत अजूनही १.२५ लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त ठेवण्यात आली आहे. 

यावेळी कंपनीने स्कूटरला नवीन लूक देण्यासाठी दोन नवीन कलर दिले आहेत .

स्टील ब्लू आणि एबोनी ब्लॅक. हे रंग, आधीच अस्तित्वात असलेल्या फायर फ्युरी डार्क रेड आणि स्नोफ्लेक व्हाइट शेड्ससह, आता अधिक पर्याय देतात.

स्कूटरची श्रेणी देखील वाढविण्यात आली आहे. आता ती एका चार्जवर १५० किमी पर्यंत धावू शकते, ती पूर्वीपेक्षा २० किमी जास्त आहे. यामुळे दररोजचा प्रवास आणि लांब पल्ल्याचा प्रवास आणखी सोपा झाला आहे.

आता प्रत्येक प्रकारात मोबाईल चार्जिंग पोर्ट आहे, यामुळे तुम्ही प्रवास करताना तुमचे डिव्हाइस चार्ज करू शकता. 

एक नवीन LMFP बॅटरी देण्यात आली आहे, ती उष्णता चांगल्या प्रकारे सहन करू शकते आणि बॅटरीची सुरक्षितता वाढवते.

ही स्कूटर इटालियन ऑटोमोटिव्ह डिझायनर अलेस्सांद्रो टार्टारिनी यांनी डिझाइन केली आहे. 

ही स्कूटर हाय-टेन्साइल ट्यूबलर स्टील फ्रेमवर बनवण्यात आली आहे. यात १२-इंच टायर, समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस प्रोग्रेसिव्ह कॅन्टिलिव्हर मोनो-शॉक सस्पेंशन आहे.

Tennis 1500 मध्ये तीन रायडिंग मोड्स आहेत - इको, नॉर्मल आणि स्पोर्ट. जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार मोड बदलू शकता.

यात ५ इंचाचा फुल-कलर टीएफटी स्क्रीन, कीलेस स्टार्ट आणि साइड स्टँड मोटर कट-ऑफ सेन्सर सारखे स्मार्ट फीचर्स आहेत.

Click Here