राेजच्या आयुष्यातला निवांतपणा, शांतपणा कुठेतरी हरवत चालला आहे. जगभरात हेच चित्र दिसत असलं, तरी जगाच्या पाठीवर आजही एक 'निवांत गाव' गाव आहे.
जगभरात गाेंगाट, प्रदूषण हे विषय नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे हाेणारे मानसिक, शारीरिक त्रास काेणाला चुकले नाहीत.
जगात एकीकडे असं चित्र असलं, तरी नेदरलँड्समधील Giethoorn एक निवांत गावं आहे. या गावात पाण्याच्या वाटा आहेत. रस्ते नाहीत.
या गावात सगळेजण बाेटीतून प्रवास करतात. प्रत्येक घराजवळ एक लहान कालवा आहे. इथे गाड्या नाही, त्यामुळे ट्रॅफिक नाही.
गाेष्टीमधल्या गावांप्रमाणे घरे, फुले आणि पूल या गावात आपल्याला दिसतात. सगळीकडे वातावरणात एक शांतता असते.
शहरापासून दूर वसलेल्या गावात पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा खळखळाट. इतकेच आवाज ऐकायला मिळतात.
गावात प्रवास करायचा असेल, तर बाेटीनंतर दुसरा पर्याय सायकल. आराेग्यदायी आणि पर्यावरणपूरक अशी इथल्या लाेकांची जीवनशैली आहे.
इथल्या बाेटी या गॅसवर चालत नाहीत. तर या बाेटी इलेक्ट्रिकल आहेत. यामुळे बाेटींचा आवाज हाेत नाही, प्रदूषणही हाेत नाही.
निसर्गाने बहरलेलं, शांत गाेंगाटविरहीत असल्याने जगातलं शांत गाव म्हणून याची ओळख आहे.