वडाळा ते गेटवे अंडरग्राउंड मेट्रोसाठी द्यावे लागणार ६० रुपये

२०३१ मध्ये सुरु होणार वडाळा ते गेटवे अंडरग्राउंड मेट्रो

 मुंबई मेट्रो लाईन-११ प्रकल्पाला अखेर महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च २३,४८७ कोटी असेल. या नवीन मेट्रो लाईनमुळे वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. 

बस आणि लोकल ट्रेन व्यतिरिक्त, मेट्रो देखील मुंबईत वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे  सरकारने वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

नवीन मेट्रो लाईन ११ चा मार्ग वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया (कुलाबा) पर्यंत बांधला जाईल. या मार्गावर एकूण १४ स्थानके असतील आणि विशेष म्हणजे ही जवळजवळ सर्व स्थानके भूमिगत असतील.

या मार्गिकेच्या उभारणीसाठी खर्च भागविण्यासाठी तिकीट विक्रीव्यतिरिक्त 'नॉन फेअर बॉक्स' आणि अन्य माध्यमातूनही उत्पन्न मिळविण्याचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रयत्न आहे.

वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया ही भुयारी मेट्रो ११ मार्गिका २०३१ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. २०५५ पर्यंत या मेट्रो मार्गिकेची प्रवाशी संख्या १०.१२ लाख होण्याची शक्यता आहे.

मेट्रो ११ मार्गिका वडाळा येथील आणिक डेपोपासून सुरू होणार असून मेट्रो मार्गिकेची लांबी १७.५१ किमी, भूमिगत मार्गाची लांबी १६.८३ किमी, उन्नत मार्गाची लांबी ०.६६७ किमी असणार आहे.

ही लाइन मेट्रो लाइन ४ चा विस्तार असून याच्या डब्ब्यांची संख्या ६ असणार असून गाडीचा वेग ८० किमी प्रति तास असणार आहे. १८ किलोमीटरच्या प्रवासासाठी ६० रुपये भाडं निश्चित करण्यात आलं आहे.

आणिक बस डेपो, वडाळा डेपो , CGS कॉलनी, गणेशनगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हाय बंब दारूखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, सीएसएमटी, हार्मोनियम सर्कल, गेटवे ऑफ इंडिया या स्थानकांवरुन मेट्रो धावणार आहे.

Click Here