क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण अनेक वर्षांपासूनचे आहे. दोन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटींचे एकमेकांशी कनेक्शन असतं.
काही खेळाडूंच्या पत्नी बॉलिवूडशी कनेक्टेड असतात, तर काहींच्या गर्लफ्रेंड किंवा बहिणी मॉडेलिंग करत असतात.
सध्या अशाच एका मॉडेलची चर्चा आहे. ती मॉडेल म्हणजे मुंबई इंडियन्सचा गोलंदाज दीपक चहरची सख्खी बहीण.
दीपकच्या बहिणीचं नाव मालती चहर असं आहे. ती सुरूवातीला IPL मध्ये 'मिस्ट्री गर्ल' म्हणून फेमस झाली होती.
मालती आधीपासूनच फॅशन इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग असाइनमेंट्स केली आहेत.
ताज्या फोटोशूटमध्ये मालतीने साडीतला एक सुंदर लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती सुंदर दिसतेय.
मालतीने या लूक मधील निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला आहे.
मालतीला क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याचीही खूप आवड आहे. ती अनेकदा स्टेडियममध्येही मुंबईला चिअर करताना दिसते.