१८२५ पासून अनेक मल्लांना घडविणारी आजही कुस्तीचे धडे देणारी मोतीबाग तालीम
तालमीला २०० वर्षे पूर्ण तरी भवानी मंडपाजवळ मोतीबाग तालीम तितक्याच जोमाने उभी
मोतीबाग तालीममध्ये खुद्द राजर्षी शाहू महाराजांनीही कुस्तीचे धडे गिरविले
तालीममध्ये वस्ताद त्या मल्लांकडून एकावेळी अडीच हजार जोर-बैठका काढून घेतात
नवोदितांसाठी व्यायाम, आहार,राहण्याची व्यवस्था,जेवण करून खाण्याची पद्धत आजही तालमीत आहे
१८ वर्षांवरील मल्लास महिन्याकाठी ३० हजार खर्च, तर १० ते १८ वर्षांपर्यंतच्या मल्लास किमान २० ते २५ हजार खर्च
मुख्य कुस्तीचा आखाडा, पैलवानांना राहण्यासाठीच्या खोल्या, मॅट हॉल, ऐतिहासिक मारुती मंदिर असा परिसर
मल्ल वयाच्या दहाव्या वर्षी वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली येतो. वस्तादांच्या केवळ पायांकडे पाहण्याची आजही परंपरा
अनेक महाराष्ट्र केसरी,कुस्तीसम्राट,हिंदकेसरी, आॅलिम्पिकवीर या तालमीने देशाला दिलेत. याचा कोल्हापूरकरांना अभिमान.