पावसाळ्यात त्वचासारखी तेलकट होते अशावेळी काय करावं?
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन त्वचा तेलकट होते. त्यामुळे मुरुमे येतात. यावेळी काही फेसपॅक वापरल्यास फायदा होईल.
आपली त्वचा अधिक तेलकट असेल तर कडुलिंबाचा फेस पॅक आपण वापरु शकतो.
यासाठी कडुलिंबाची पाने घेऊन त्याची पेस्ट तयार करा. त्यात मध घालून चेहऱ्यावर राहू द्या. सुकल्यानंतर धुवा.
मुलतानी माती त्वचेला सुंदर बनवते. यात असणारे घटक त्वचेवरील तेल कमी करते.
पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट झाल्यानंतर गुलाब पाण्यात मुलतानी माती मिसळून त्याची पेस्ट त्वचेवर लावल्यास फायदा होईल.
मुलतानी माती आणि दही त्वचेला मिसळून लावल्यास त्वचा मऊ होईल. तसेच चेहऱ्यावरील घाण साफ होईल.
बेसन त्वचेला स्वच्छ करण्यास मदत करते. यात क्लिंजिंगएजंटसारखे काम करणारे घटक आहेत. यात हळद आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा.
पावसाळ्यात हा पॅक नियमितपणे लावल्यास फायदा होतो. यामुळे मुरुमे आणि तेल कमी होते.