Sugar Cravings वर प्रभावी मेषशृंगी कधी ठरतं धोकादायक?
गोड खाण्याचे क्रेव्हिंग नियंत्रणासाठी मेषशृंगी हे भारतीय प्राचीन औषध उपयुक्त मानलं जातं.
गोड खाण्याचे क्रेव्हिंग नियंत्रणासाठी मेषशृंगी (जिम्नेमा सिल्वेस्टरे) हे भारतीय प्राचीन औषध उपयुक्त आहे, असा दावा डॉ. विजय नेगलुर यांनी केला आहे.
मेषशृंगीच्या सेवनामुळं गोडाची चव तात्पुरती कमी होते आणि साखर खाण्याकडे ओढही कमी होऊ शकते.
याचा वापर डॉक्टर, आयुर्वेदिक तज्ञ किंवा डायटिशियन यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा असा सल्ला देखील डॉ. विजय नेगलुर यांनी दिला आहे.
मेषशृंगी प्रभाव पॉवरफुल असलेल्या या औषधाचा डोस, शुद्धता आणि स्वरूप महत्त्वाचे आहेत.
स्वतःच्या मनानं या औषधाचा वापर हा अत्यंत धोकादायक आहे. यामुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते.
गरोदर महिला, लहान मुले किंवा रक्तातील साखर सतत चढ उतार होणाऱ्या व्यक्तींनी मेषशृंगी औषध घेऊ नये, असा सल्ला दिला आहे.
हे औषध इतर औषधांशी (खास करून मधुमेहावर घेण्यात येणाऱ्या गोळ्या) व अन्य सप्लिमेंट्सशी रिअॅक्शन करू शकते.
हे औषध रक्तातील साखर अतिशय कमी होऊ शकते. तसेच लो ब्लड शुगरची काही लक्षणे लपवू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
गोड खाण्याची क्रेव्हिंग नियंत्रणासाठीचे इतर उपाय देखील चांगले आहेत. मॅग्नेशियमयुक्त आहार (पालक, बदाम, भोपळ्याच्या बिया), पुरेसे पाणी, शुगरफ्री च्युइंगम, आणि स्टीवियासह डार्क चॉकलेट.
गोड खाण्याची ओढ ही सहसा खऱ्या पोषणाच्या, ब्लड शुगरच्या किंवा मेटॅबॉलिक अशांततेची खूण असू शकते, त्यामुळे मुख्य कारण शोधून उपाय करावेत.