मर्लिन फिश, याच माशाला 'अबू सिराह' देखील म्हटले जाते. हा मासा जगातील सर्वात खतरनाक माशांपैकी एक असून तलवारीसारखी चोच आणि ट्रेनसारख्या वेगासाठी प्रसिद्ध आहे.
मर्लिन फिशची लांब आणि टोकदार चोच, तलवारीसारखी असते. ती तीन ते चार फुटांपर्यंतही असू शकते. हिचा वापर शिकार करण्यासाठी आणि ती कापण्यासाठी होतो.
मर्लिन माशाचा समुद्रातील वेग ताशी ११० किमीपर्यंत असतो. यामुळे हा मासा जगातील सर्वात वेगवान माशांपैकीहे एक आहे.
हा मासा अत्यंत वेगाने हल्ला करून शिकार करतो आणि चोचीच्या सहाय्याने शिकार कापतो. महत्वाचे म्हणजे, हा मासा टुना, मॅकेरल आणि छोट्या समुद्री जीवांची शिकार करतो.
या माशाची चोक एवढी तीक्ष्ण असते की, ती नावेलाही सहजपणे भेदू शकते. संतापल्यानंतर ती मच्छी मारांवरही हल्ला करू शकते.
हा मासा १६ फुटांपर्यंत लांब असू शकतो आणि याचे वजन ८०० किलोपर्यंत असू शकते. याचे बळकट शरीर आणि पंख याला 'सुद्राचा दबंग' बनवतात.
मर्लिन मसा अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात आढळते. त्याला खोल समुद्रात रहायला आवडते.