चित्रपटसृष्टीत काम देण्याच्या मोबदल्यात स्ट्रगलिंग कलाकारांकडून वाटेल त्या गोष्टींची त्यातही खास करुन शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार काही नवा नाही.
असाच एक धक्कादायक प्रकार मराठी अभिनेत्रीसोबत घडला होता. ती अभिनेत्री आहे नेहा पेंडसे.
नेहा पेंडसे हिनं मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे.
पण, जेव्हा अभिनेत्रीचा संघर्षाचा काळ सुरू होता, तेव्हा तिला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता.
नेहाला चित्रपटसृष्टीत काम करताना, अनेक जणांकडून कास्टींग काऊचची ऑफर आली होती. स्वतः नेहाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
नेहानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, एकदा एका अभिनेत्यानं तिला चुकीच्या हेतूने त्याच्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर दिली. पण तिने हे करण्यास स्पष्ट नकार दिला.
कास्टींग काऊचवर नेहा म्हणाली, "मी नेहमीच या गोष्टीला विरोध करुन पुढे गेले आहे".