फळांचा राजा 'आंबा' केवळ चवीलाच गोड नसून तो आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वांनी युक्त आहे.
फळांचा राजा 'आंबा' केवळ चवीलाच गोड नसून तो आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वांनी युक्त आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. हे घटक शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात, ज्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.
आंब्यात 'झियाक्सॅन्थिन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए असते. हे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करतात आणि वाढत्या वयानुसार येणारा अंधुकपणा किंवा डोळ्यांची जळजळ कमी करतात.
आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि फायबर जास्त असते. तसेच यात काही असे एन्झाइम्स असतात जे अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
आंब्यामध्ये फायबर, पेक्टिन आणि व्हिटॅमिन सी असल्याने ते रक्तातील 'बॅड कोलेस्ट्रॉल'ची पातळी कमी करण्यास मदत करतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
आंबा खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यातील व्हिटॅमिन सी मुळे कोलेजनची निर्मिती वाढते, ज्यामुळे त्वचा तजेलदार, कोमल आणि चमकदार दिसते.
आंब्यामध्ये 'ग्लूटामिन ॲसिड' नावाचे घटक असतात. हे मेंदूच्या पेशींना सक्रिय ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात.