मालती चहरचा राजेशाही थाट
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मालती चहर 'बिग बॉस १९' च्या पर्वात दिसली. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे.
मालती चहर सध्या तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. मालतीने नुकतंच एक खास राजेशाही लूकमध्ये फोटोशूट केलं.
या फोटोंमध्ये मालती एखाद्या महाराणीसारखी भासत आहे.
मालतीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
मालतीने या फोटोशूटसाठी एक अतिशय वजनदार आणि सुंदर सोनेरी लेहेंगा परिधान केला.
हा राजेशाही लूक पूर्ण करण्यासाठी तिने कपाळावर पट्टी, नथ आणि एक भव्य नेकपीस असे भरजरी दागिने घातले.
या दागिन्यांमुळे तिच्या सौंदर्याला अधिकच झळाळी मिळाली आहे.
कपाळावर लावलेली एक छोटी लाल बिंदी तिच्या संपूर्ण सौंदर्यात भर घालत आहे.