मलायका सारखं पन्नाशीतही यंग दिसाचंय.. या Exercises ना नाही पर्याय
बॉलीवडू अभिनेत्री मलायका अरोरा वयाची पन्नाशी ओलांडून गेली तर एकदम फिट आहे.
बॉलीवडू अभिनेत्री मलायका अरोरा वयाची पन्नाशी ओलांडून गेली तर एकदम फिट आहे. तिच्याएवढं नाही मात्र थोडं तरी आपण देखील फिट रहावं असं अनेकांना वाटतं.
म्हणूनच आज आम्ही मलायकाचा exercises चार्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मलायका आपल्या रूटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करते.
मलायका HIIT Circuits ट्रेनिंग करते. हा व्यायाम प्रकार खूप इंटेन्स आणि थकवणारा आहे. यात ६० सेकंद जंपिंग, ४० सेकंद ग्लुट किक, ५० सेकंद स्किपिंग रोप, ३० सेकंद हाय नी टॅप असे प्रकार असतात.
या व्यायाम प्रकारामुळं तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज लागत नाही. हे व्यायाम प्रकार फॅट बर्नसाठी उपयुक्त ठरतात.
मलायका योगावर देखील चांगला भर देते. ती नियमीतपणे सूर्य नमस्कार आणि अॅडव्हान्स फ्लेक्सिबिलिटी स्ट्रेचेस केले करते.
योगामुळं मलायकाचा स्टॅमिना बिल्ट होतो, तसेच बांधा सुडोल होतो, शरिराची लवचिकता वाढते. पन्नाशी ओलांडलेल्या महिलांसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.
मलायका कोअर स्ट्रेंथ साठी Pilates हा व्यायाम प्रकार करते. याचा फायदा पोस्चर आणि लवचिकता सुधारण्यात देखील होतो.
मलायका आपल्या exercises चार्ट मध्ये कार्डिओ अर्थात रनिंग, स्विमिंग यासारखे व्यायाम प्रकार देखील समाविष्ट करते. यामुळं फॅट लॉस होण्यास मदत होते.
मलायका ताकद वाढवण्यासाठी स्विस बॉल आणि डंबेल वर्कआऊट देखील करते. यात लेग कर्ल, स्टॅबिलिटी बॉल लेग एक्स्टेंशन, समो स्क्वाड्स, बायसेप्स कर्ल असे व्यायाम समाविष्ट असतात.