विकतसारखे परफेक्ट शंकरपाळे घरीच करा झटपट...
मैद्याची गुणवत्ता तपासा चांगल्या प्रतीचा मैदा वापरा, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होते.
योग्य मोहन वापरापीठ मळताना मोहनसाठी वापरलेले तूप किंवा तेल योग्य प्रमाणात असावे, ज्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत आणि कमी तेलकट होते.
सोडा वापरणे टाळाकाही लोक शंकरपाळी हलकी होण्यासाठी सोडा किंवा बेकिंग पावडर वापरतात, परंतु यामुळे शंकरपाळी बिघडू शकते.
गोड चवीसाठी साखरेचे प्रमाणजर तुम्हाला गोड शंकरपाळी हवी असेल, तर पिठात आवश्यकतेनुसार साखरेचे प्रमाण वाढवू शकता.
पीठ योग्य मळाकणिक जास्त घट्ट किंवा सैल मळू नका. पीठ मळून झाल्यावर ते १५-२० मिनिटे झाकून ठेवा, यामुळे शंकरपाळी मऊ न होता खुसखुशीत होते.
पातळ शंकरपाळी कापाशंकरपाळी कापताना त्याचे पातळ काप करा. त्यामुळे त्या चांगल्या तळल्या जातात आणि खुसखुशीत बनतात.
तेलाचे तापमान तपासाशंकरपाळी तळण्यासाठी तेल योग्य तापमानाचे असावे. खूप गरम तेलात शंकरपाळी टाकल्यास बाहेरून करपेल आणि आतून कच्ची राहील.
शंकरपाळी सोनेरी रंगावर तळाशंकरपाळीचा रंग सोनेरी किंवा हलका तपकिरी होईपर्यंत तळा.
जास्त तेल पिळू नकाशंकरपाळी तळल्यानंतर जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी जाळीदार चमच्याचा वापर करा किंवा पेपर नॅपकिनवर ठेवा.
थंड झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवाशंकरपाळी पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे ती जास्त काळ कुरकुरीत राहते.