काचेचा पूल, खालून पाणी... तो ही महाराष्ट्रात; कुठे, कसे जायचे...

Click Here

तुम्ही काचेचा पूल चीनमधील व्हिडीओंमध्ये पाहिला असेल. आता तो तुम्हाला महाराष्ट्रातही पहायला मिळणार आहे. 

महाराष्ट्रात कुठे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. कसे जायचे, कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काचेच्या पुलावरून चालताना हलक्या काळजाच्या लोकांना जरा सावधच रहावे लागेल. धाडस असेल तरच तुम्ही त्यावरून चालू शकता.

कारण हा पूल एका धबधब्याच्या ठिकाणी, खालून वेगाने पाणी वाहत जाताना दिसते अशा ठिकाणी आहे. 

म्हणजे पावसाळ्यातच तुम्हाला याची मजा घेता येणार आहे. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात एवढी मजा येणार नाही. 

महाराष्ट्रातील पहिला वहिला काचेचा पूल सिंधुदूर्गमध्ये आहे. तुम्हाला वैभववाडीचा नापणे धबधबा माहिती आहे का? तिथेच...

मुंबईतून सुमारे ४०० किमी, पुण्यातून ३०८ किमी, कोल्हापूर ८६ किमी एवढ्या अंतरावर हा पूल आहे. 

तुम्ही मुंबईहून ट्रेनने देखील जाऊ शकता. सर्वात स्वत आणि जवळचा पर्याय. कारण वैभववाडी रेल्वे स्टेशन हे या धबधब्यापासून अवघ्या ४ किमीवर आहे. 

कणकवली ३६ किमीवर आहे. नुकतेच या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. २२ मीटर लांब आणि २ मीटर रुंद असा हा पूल आहे. 

Click Here